Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
हा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ इंग्लंडला पोहोचले असून खेळाडूंची तयारीला सुरुवात झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू या अंतिम सामन्यासाठी कसून सराव करत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
खेळाडू नेट्समध्ये घाम गाळत असून फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत.
दरम्यान, भारत दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे.
यापूर्वी 2019-21 दरम्यान झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या पहिल्या पर्वातही भारताने अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.
तसेच ऑस्ट्रेलियाची मात्र कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.