Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज तिवारीने 3 ऑगस्ट 2023 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.
मनोजने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या निवृत्तीचा निर्णय सर्वांसमोर घोषित केला.
पश्चिम बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तिवारीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मनोज सध्या पश्चिम बंगालमध्ये क्रीडा मंत्री म्हणून देखील काम करतो.
तिवारीने त्याच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'क्रिकेटच्या खेळाला अलविदा. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे, मला म्हणायचे आहे की ती प्रत्येक गोष्ट दिली ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.'
मनोजने त्याच्या या पोस्टमध्ये त्याचे पितृतुल्य प्रशिक्षक मनाबेंद्र घोष यांचे विशेष आभार मानले आहे.
तसेच त्याने सर्व प्रशिक्षक, संघसकारी, कुटुंब, चाहते आणि त्याच्या क्रिकेट प्रवासात योगदान देणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मनोजने 'थँक्यू क्रिकेट' असे म्हणत पोस्टची अखेर केली आहे.
मनोज तिवारीने भारताकडून 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो भारताकडून 12 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.