Manish Jadhav
ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यावर खेळाबरोबरच देशाच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. नीरज हे भारतीय लष्करात सुभेदार म्हणून कार्यरत आहेत.
भारतासाठी सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही लष्कराशी संबंधित आहे. धोनी 2011 पासून भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहे.
भारताला क्रिकेटमधला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देवही लष्कराचा एक भाग राहिले आहेत. ते मानद अधिकारी म्हणून रुजू झाले होते.
नेमबाजीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा हा देखील लष्कराचा एक भाग आहे. 2011 मध्ये बिंद्राला लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
सचिन तेंडुलकरही लष्कराचा एक भाग राहिला आहे. सचिन भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे. एवढेच नाही तर त्याने सुखोई-30 एमकेआयमध्येही उड्डाण केले.
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग हे देखील लष्करात अधिकारी होते.
नेमबाजीत भारतासाठी अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारे राज्यवर्धन सिंह राठोडही लष्कराचा एक भाग राहिले आहेत. ते लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत.