Manish Jadhav
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या ग्रुप स्टेजमधील भारत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत, या सामन्याच्या निकालावरुन ग्रुप स्टेजमध्ये कोणता संघ अव्वल स्थानी असणार हे स्पष्ट होणार आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला खास रेकॉर्ड करण्याची नामी संधी आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपर्यंत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या नावावर आहे. तर अनिल कुंबळे दुसऱ्या स्थानी आहे. जर शमीने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या तर तो खास यादीत अनिल कुंबळेची बरोबरी करेल, तर जर त्याने तीन विकेट्स घेतल्या तर तो माजी फिरकी गोलंदाजाला मागे टाकेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे.
आता दोन्ही संघ पुढील सामन्यात एकमेकांसमोर येतील. या लढाईने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी कोण असणार हे ठरणार आहे. तो सामना जिंकणारा संघ पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 ठरेल.