Akshay Nirmale
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर खरा आधार असतो आपण केलेली आर्थिक बचत, किंवा आपण केलेले आर्थिक नियोजन. ते नसेल तर वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगायला लागू शकते.
एलआयसीच्या न्यू जीवन शांती पॉलिसी मध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतर पेन्शचा लाभ घेता येऊ शकतो. हा एक अॅन्युईटी प्लॅन असून तो खरेदी केल्यावर तुमची पेन्शनची रक्कम फिक्स होते.
या पॉलिसीत दोन पर्याय आहेत. डेफर्ड अॅन्युईटी फॉर सिंगल लाईफ आणि डेफर्ड अॅन्युईटी फॉर जॉईंट लाईफ. पैकी पहिल्या पर्यायात एका व्यक्तीसाठी पॉलिसी खरेदी करता येऊ शकते.
एका व्यक्तीसाठी 10 रूपयांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला महिन्याला 11 हजार 192 रूपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन वार्षिक, तिमाही, सहामाही अशीही घेता येईल.
या पॉलिसीत किमान रक्कम 1.5 लाख रूपये गुंतवावी लागेल. एवढ्या रकमेवर महिन्याला 1000 रूपये पेन्शन मिळेल.
30 ते 79 वयोगटातील कोणताही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकतो. जर पॉलिसी आवडली नाही तर ती कधीही बंद करता येईल.
पॉलिसीधारक हयात असल्यास त्याला एका ठराविक काळानंतर पेन्शन सुरू होते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर सर्व रक्कम नॉमिनीला मिळेल.