Akshata Chhatre
लहान मुलगी जेव्हा १५ ते १८ वयाच्या टप्प्यात किशोरवयीन अवस्थेतून प्रौढतेकडे वाटचाल करत असते, तेव्हा तिच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होतात.
हा काळ तिच्या विचारसरणीचा आणि आत्मविश्वासाचा पाया ठरतो. अशावेळी आईप्रमाणेच वडिलांचा आधार तिच्यासाठी फार महत्त्वाचा असतो.
वडिलांनी मुलीला नेहमी समजावलं पाहिजे की तिची खरी किंमत दुसऱ्यांच्या मतावर किंवा समाजाने केलेल्या न्यायनिवाड्यावर अवलंबून नसते. ती स्वतः तिची ओळख ठरवते.
अनेकदा मुलींना समोरच्याला दुखवू नये म्हणून "नाही" म्हणणं अवघड जातं. पण वडिलांनी तिला समजावलं पाहिजे की "नाही" म्हणणं हे देखील एक धैर्य आहे.
लोक म्हणतात की शांत राहणं हे मोठेपणाचं लक्षण आहे, पण प्रत्येकवेळी तसं नसतं. जर काही अन्यायकारक वाटलं, किंवा चुकीचा अनुभव आला, तर शांत बसू नये.
वडिलांनी मुलीला नेहमी आठवण करून द्यावी की तिचं खरं सामर्थ्य तिच्या शिक्षणात, ज्ञान आणि कौशल्यात आहे. ही अशी ताकद आहे जी कोणीही तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
दिलेलं वचन पूर्ण करणं आणि विश्वास पाळणं हे तुमच्या नात्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण विश्वास हा मुलीसाठी सर्वात मौल्यवान ठेवा ठरतो, जो तिच्या आयुष्याला मजबूत बनवतो