Akshata Chhatre
पती-पत्नीचं नातं हे जगातलं सर्वात खास आणि आधार देणारं असतं. परस्परांना मनातली प्रत्येक गोष्ट सांगून मन मोकळं केल्यास हे नातं सुखासमाधानाचं होतं.
अनेक नवरे मंडळींना नेहमी वाटत राहतं की त्यांची पत्नी वारंवार भांडण का उकरून काढते आणि ते या गोष्टीला संसाराच्या दुःखासाठी जबाबदार धरतात.
तुमची पत्नी तुमच्याशी वाद घालत असेल, तर त्याचा अर्थ तिला तुमच्या नात्याची काळजी आहे. जेव्हा ती वाद घालणे थांबवते, तेव्हा ते शांततेचे लक्षण नसते, तर तुम्ही तिच्यापासून भावनिकरित्या दूर गेल्याचे ते लक्षण असते.
तुमची पत्नी प्रत्यक्षात तुमच्याशी भांडत नाहीये, तर ती 'कशासाठी तरी' भांडत आहे. ती गोष्ट कदाचित नात्यातील संबंधांसाठी असू शकते, किंवा ती परस्पर सामंजस्यासाठी भांडत असू शकते.
जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला गप्प करता किंवा तिच्या मतांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही ती अदृश्य आहे, असं भासवता. तुम्ही तिला ओरडण्यापासून रोखता, तेव्हा नकळतपणे तिची सुरक्षितता नष्ट करता.
जेव्हा पत्नी तुमच्यासोबत तिचे विचार किंवा तक्रारी शेअर करणे थांबवते, तेव्हा तुमचे नाते शांततेत संपुष्टात येते.
तुमच्या पत्नीच्या शांततेचे कारण बनू नका; त्याऐवजी, तिला बोलू द्या. तिला सत्य व्यक्त करू द्या. यामुळे आनंदी नाते आणि आनंदी पत्नी सुनिश्चित होईल.