गोमन्तक डिजिटल टीम
द्राक्षामधेही लोहाचं प्रमाण भरपूर असतं. ते हिमोग्लोबीन तयार करतं तसेच हिमोग्लोबीनसंबंधीचे आजार बरे करण्याची ताकद द्राक्षामधे असते.
डाळींमधे प्रथिनं असतात तसेच रोज डाळ भात, डाळ-पोळी किंवा केवळ सूप म्हणून डाळ खाल्ल्यास शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं.
बीट हा लोह वाढवणारा घटक आहे. 1 ग्लास बीटाच्या ज्यूसमधे एक चमचा मध घालून रोज प्यायल्यास लोहाची कमतरता भरुन निघते.
गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. तसेच लोह वाढण्यासाठी गूळ शेंगदाणे हे एकत्र खाणं फायदेशीर असतं.
शेंग भाज्यांमधे घेवडा ही भाजी लोह वाढण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. अ, क, के, बी6 या जीवनसत्त्वांनी युक्त ही भाजी शरीराची पोषक घटकांची गरज पूर्ण करते.
शरीरातील लोह वाढवण्यासाठी आहार जितका महत्त्वाचा तितकंच लोखंडी भांडयांमधे स्वयंपाक करणंही फायदेशीर ठरतं.