Akshata Chhatre
नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि मोकळा संवाद महत्त्वाचा असतो, पण त्याचबरोबर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणेही तेवढेच गरजेचे असते.
प्रत्येक सवयीवर किंवा छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून समोरच्याला बदलण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
कारण त्यामुळे तो/ती अस्वस्थ होऊ शकते. तसेच भूतकाळातील नातेसंबंधांच्या आठवणी किंवा तुलना नवे नाते कमजोर करू शकतात.
त्यामुळे त्या मनातल्या मनातच ठेवणे शहाणपणाचे आहे.
कुटुंबातील सदस्यांची तुमच्या जोडीदाराबद्दल वेगळी मते असू शकतात, पण ती शब्दशः सांगणे नात्यात दुरावा निर्माण करू शकते.
काही लोकांविषयी आकर्षण असणे स्वाभाविक असते, मात्र त्यावर जास्त भर देणे किंवा त्याबद्दल अनावश्यक खुलासे करणे नात्याला धोकादायक ठरू शकते.
म्हणूनच, ज्या गोष्टी तुमच्या नात्यात विषारी वातावरण निर्माण करत नाहीत, त्या बाबतीत संयम आणि मौन अधिक फायदेशीर असते.