Kavya Powar
आपल्यापैकी असे अनेकजण असतात ज्यांना सतत गरम होत असते
कोणत्याही ऋतुमध्ये या लोकांना गरम होत असेल तर यामागील कारणे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे
शरीराचे तापमान साधारणपणे ९८.६ अंश फॅरेनहाइट असते. मात्र, वय, काम आणि ठिकाणानुसार यामध्ये थोडा फरक असू शकतो
आपली रक्ताभिसरण प्रणाली तापमान नियंत्रित करते. जेव्हा जेव्हा एखाद्याला खूप गरम वाटते तेव्हा शरीरातील शिरा विस्तारतात.
त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. जेव्हा तुम्हाला थंडी वाजते तेव्हा समजून घ्या की रक्तवाहिन्या आकसतात.
जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर शरीरात रक्त वेगाने वाहू लागते. त्यामुळे तुम्हाला जास्त गरम होते.
जर तुम्ही खूप मसालेदार अन्न खाल्ले किंवा खूप कॅफिन आणि अल्कोहोल घेतल्यास तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि तुम्हाला गरम आणि घामही येऊ लागतो.