Akshata Chhatre
नात्यात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो, पण काही लोक असे असतात, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवल्यास तुम्हाला भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते.
नाते हे दोन बाजूंनी चालते, पण काही लोक फक्त आणि फक्त स्वतःचेच बोलतात. त्यांना तुमचे मत, तुमच्या भावना किंवा तुमच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नसते.
विश्वासाची भिंत सत्यावर उभी असते, पण काही लोकांना खोटे बोलण्याची सवय असते. ते अगदी लहानसहान गोष्टींवरही खोटे बोलतात आणि त्यांच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवता येत नाही.
जर एखादी व्यक्ती तुमच्या मित्रांबद्दल वाईट गोष्टी बोलत असेल किंवा त्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजा की त्याला तुमचे नाते कमकुवत करायचे आहे.
एखादी व्यक्ती केवळ तुमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये तुमच्यासोबत असेल आणि तुमच्या अडचणीच्या वेळी अचानक गायब होत असेल, तर तो तुमचा खरा साथीदार नाही.
जर एखादी व्यक्ती नेहमी तुमच्या उणिवा मोजत असेल आणि तुम्हाला कोणत्याही कामासाठी प्रोत्साहन देत नसेल, तर तो तुमच्या आत्म-सन्मानाला ठेच पोहोचवत आहे.
अशा लोकांसोबत राहिल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो.