Akshata Chhatre
ऑफिसमध्ये काम करताना काही लोक आपल्याला खूप चांगले वाटतात, पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असतो.
असे लोक ओळखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
असे लोक तुमची खूप जास्त स्तुती करतात, पण ते कृत्रिम वाटते आणि अनेकदा त्यानंतर लगेचच त्यांची काहीतरी मदत हवी असते.
ते तुमच्याकडून वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा वापर ते नंतर त्यांच्या फायद्यासाठी किंवा तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी करू शकतात.
सतत इतरांबद्दल, अगदी त्यांच्या मित्रांबद्दलही, गॉसिप करतात. यामुळे ते तुमच्याबद्दलही असेच बोलू शकतात, हे लक्षात येते.
त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी ते तुमच्या कामाचे किंवा कल्पनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा एखादी चूक होते, तेव्हा ते आपली जबाबदारी स्वीकारत नाहीत, उलट पटकन दुसऱ्यांवर दोष ढकलतात.