Akshata Chhatre
लग्न झाल्यावर लगेचच बाळासाठी कुटुंबाचा आग्रह सुरू होतो. पण हा निर्णय शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक तयारी झाल्यावरच घेतला पाहिजे.
वैद्यकीयदृष्ट्या पाहिल्यास, स्त्री मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते ती बंद होईपर्यंत गर्भवती होऊ शकते, पण जसजसे वय वाढते तसतशी प्रजनन क्षमता कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, गर्भवती होण्यासाठी २० च्या दशकाच्या उत्तरार्ध आणि ३० च्या सुरुवातीचा काळ हा सर्वोत्तम असतो.
२० ते ३० वर्षे या वयोगटातील महिलांमध्ये प्रजनन क्षमता सर्वाधिक असते. या काळात स्त्रीबीजे निरोगी असल्याने गर्भधारणेची शक्यता जास्त असते.
३० वर्षांनंतर महिलांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते, पण तरीही हे वय सुरक्षित मानले जाते.संतुलन
सध्याच्या युगात महिलांना करिअर आणि मातृत्व या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधावे लागते.
आयव्हीएफ, एग फ्रीझिंग आणि इतर वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे, आता ३५-४० वर्षांच्या वयातही निरोगी गर्भधारणा शक्य होत आहे.