Akshata Chhatre
आयस्क्रीमसाठी जगभरात प्रचंड क्रेझ आहे. आकडेवारीनुसार, दरवर्षी लोक तब्बल १५.४ अब्ज लिटर आयस्क्रीम खातात. ही संख्या दाखवते की हा गोड पदार्थ जगात किती लोकप्रिय आहे!
आयस्क्रीमच्या जन्माचा इतिहास फार जुना आहे. प्रारंभिक नोंदीनुसार, याचा उगम चीनमध्ये झाला असे मानले जाते.
चीनमध्ये लोक दूध, तांदूळ, साखर आणि बर्फ यांचे मिश्रण तयार करून खात असत. हेच मिश्रण आजच्या आयस्क्रीमचा आधार मानला जातो.
१३व्या शतकात प्रसिद्ध इटालियन प्रवासी मार्को पोलो यांनी हे गोड, थंडगार मिश्रण चीनमधून इटलीमध्ये आणले.
आयस्क्रीमचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी, गोठलेल्या मिठाईचा इतिहास इतर प्राचीन संस्कृतीतही आढळतो.
भारतात कुल्फी नावाचा एक पारंपरिक गोठलेला पदार्थ मुघल साम्राज्याच्या काळात लोकप्रिय होता.
आयस्क्रीम एक असा गोड पदार्थ आहे, ज्याने एका साध्या मिश्रणापासून सुरू होऊन जगभरातील लोकांना वेड लावले. चीनने दिलेली ही देणगी आजही दरवर्षी १५.४ अब्ज लिटर खाल्ली जाते!