Pranali Kodre
भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात 6 असे खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप खेळणार आहेत. याच खेळाडूंवर एक नजर टाकू.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 30 वनडे सामने खेळले असले तरी तो पहिल्यांदात वनडे वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे.
19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकणारा शुभमन गिलही पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही यंदा पहिलाच वनडे वर्ल्डकप खेळणार आहे.
भारताचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादवही त्याचा पहिला वनडे वर्ल्डकप खेळण्यास सज्ज आहे.
साल 2017 मध्ये पदार्पण करणारा श्रेयस अय्यरचा देखील पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे.
यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन देखील यंदा पहिला वर्ल्डकप खेळणार आहे.