Pranali Kodre
आयसीसीने भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जूनमध्ये जाहीर केले आहे.
या वर्ल्डकपमधील 48 सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरात खेळवले जाणार आहेत.
या 48 सामन्यांपैकी काही मोजक्या सामन्यांवर क्रिकेटप्रेमी अधिक लक्ष ठेवून असणार आहेत. यातील कोणते पाच सामने लक्षवेधक असू शकतील त्यावर एक नजर टाकू.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वर्ल्डकप 2023 मधील पहिलाच सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
यजमान भारतीय संघ वर्ल्डकप 2023 मधील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 14 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील सामना 12 ऑक्टोबर रोजी लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघातील सामना 23 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना 22 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडणार आहे.