Pranali Kodre
भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सर्व सामने भारतातील एकूण 10 शहरात होणार आहेत. हे सामने कोणत्या कोणत्या स्टेडियमवर होणार आहेत, यावर एक नजर टाकू.
अहमदाबादमधील जवळपास 1 लाख आसन क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला आणि अंतिम सामना, तसेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह एकूण 5 सामने होणार आहेत.
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची 38 हजार आसन क्षमता असून येथे तीन सामने खेळवण्यात येणार आहेत.
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 5 सामने होणार असून या स्टेडियमची आसन क्षमता 23 हजार आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरही 5 सामने होणार असून या स्टेडियमची आसन क्षमता 48 हजार आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासह 5 सामने होणार असून या स्टेडियमची 50 हजार आसन क्षमता आहे.
लखनऊमधील 50 हजार आसन क्षमता असलेल्या अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडिमयमध्ये 5 सामने होणार आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरही 5 सामने होणार असून साधारण 37,500 आसन क्षमता आहे.
बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर देखील 5 सामने होणार असून या स्टेडियमची आसन क्षमता 40 हजार आहे.
मुंबईतील 33 हजार आसन क्षमता असलेल्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य सामन्यासह 5 सामने होणार आहेत.
कोलाकातमधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर देखील एका उपांत्य सामन्यासह 5 सामने खेळवले जाणार आहेत. या स्टेडियमची आसन क्षमता 63 हजार आहे.