Manish Jadhav
ह्युंदाई इंडियाची नवीन 'एक्स्टेर फेसलिफ्ट' (Exter Facelift) 2027 च्या सुरुवातीला लाँच होणार आहे.
या अपडेटेड मॉडेलमध्ये कंपनीची पुढील पिढीची इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल.
Exter Facelift मध्ये गुगलच्या Android Auto Operating System (AAOS) चा वापर केला जाईल, ज्यामुळे ती भारतातील पहिली मास-मार्केट कार ठरेल.
कारच्या केबिनमध्ये दोन मोठे स्क्रीन असतील. एक 12.9 इंचाचा सेंट्रल टचस्क्रीन आणि दुसरा 9.9 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले असेल.
नवीन सिस्टीममध्ये ओटीए (Over-The-Air) अपडेट्स मिळतील, ज्यामुळे नकाशे आपोआप अपडेट होतील आणि अनेक थर्ड-पार्टी ॲप्स वापरता येतील.
Exter फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 83hp चे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (मॅन्युअल/AMT) कायम राहण्याची अपेक्षा आहे.
सध्या उपलब्ध असलेला 69hp चा CNG पर्याय फेसलिफ्टमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र तो सिंगल आणि ड्यूल सिलिंडरमध्ये असेल की नाही हे स्पष्ट नाही.
कारच्या एक्सरियिटर लूकमध्ये Venue सारखे बदल अपेक्षित आहेत, तर इंटिरियरमध्ये नवीन सीट अपहोल्स्ट्री आणि काही अतिरिक्त सेफ्टी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.