नवरा सतत खोटं बोलतोय? संशय न घेता 'हा' उपाय करून बघा

Akshata Chhatre

विश्वासाला तडा

खोटे बोलल्यामुळे नात्यात निर्माण होणारी संदिग्धता विश्वासाला तडा घालते आणि नात्याचा पाया कमकुवत करते, त्यामुळे हे फक्त दुर्लक्ष करून चालत नाही.

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

चिंतेचे कारण

नातेसंबंध म्हणजे प्रेम, आदर आणि पारदर्शक संवाद यांचा समतोल मेल असतो. पण जर नवरा वारंवार खोटे बोलत असेल, तर हे नक्कीच चिंतेचे कारण ठरते.

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

कारण काय?

अशा वेळी शांतपणे आणि समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून उपाय शोधणं महत्त्वाचं ठरतं. सर्वप्रथम, खोटेपणामागे कारण काय आहे हे शोधा

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

भीती

कधीकधी भीती, चुकीच्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न, किंवा तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणूनही खोटं बोला जातं.

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद

या कारणांचा शोध घेण्यासाठी नवऱ्याशी संवाद साधा, त्याला वेळ द्या आणि त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्या. एकदा शांत क्षणी त्याच्याशी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद साधा.

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

दोष देऊ नका

त्याला दोष देऊ नका, कारण थेट आरोप केल्याने तो अजूनही खोटं बोलू लागेल किंवा बचावात्मक होईल. त्याऐवजी त्याला चुका मान्य करण्यासाठी प्रोत्साहित करा.

husband lies in marriage|marriage tips | Dainik Gomantak

पावसाळ्यात येणारे किडे ठरतात त्रासदायक? कडुलिंब करेल 'छूमंतर'

आणखीन बघा