जगातल्या सगळ्यात छोटा पक्ष्याबद्दल चला जाणून घेऊ...

Rahul sadolikar

अ‍ॅपोडिफॉर्मिस कुळातला पक्षी

हमिंग पक्ष्यांचा समावेश अ‍ॅपोडिफॉर्मिस गणाच्या ट्रोचिलीडी कुलात होतो. हे रंगीबेरंगी पक्षी आकारमानाने सर्वांत लहान पक्षी असून त्यांच्या सु. ३३८ जाती आहेत.

Hummingbirds | Dainik Gomantak

दक्षिण व उत्तर अमेरिका

सर्व हमिंग पक्षी दक्षिण व उत्तर अमेरिका येथील स्थानिक आहेत. दक्षिण अमेरिकेत ते अधिक संख्येने आढळत असून त्याखालोखाल ते उत्तर अमेरिका तसेच कॅरिबियन देशांत आढळतात

Hummingbirds | Dainik Gomantak

पंखांची गती

उडताना या पक्ष्यांचे पंख अतिशय जलदपणे म्हणजे सेकंदाला 70 ते 90 वेळा फडफडतात आणि ते पुसटसेच दिसतात. त्यांच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज मधमाशी किंवा भुंगे यांच्या पंखांच्या आवाजासारखा ‘गूंSSगूंSS’ असतो. म्हणून त्यांना हमिंग म्हणजे गुंजन किंवा गुंजारव करणारा पक्षी असेही म्हणतात.

Hummingbirds | Dainik Gomantak

शरीराची रचना

हमिंग पक्ष्याचे पाय आखूड असून चोच लांब असते. यांच्या काही जातींमध्ये चोच शरीरापेक्षा लांब असते. जीभ नळीसारखी असून ती शरीरापेक्षा लांब व गुंडाळलेली असते. हमिंग पक्षी फुलांतील मधुरस (मकरंद) व कीटक खातात. जेथे फुले मुबलक असतात अशा भागात ते राहतात

Hummingbirds | Dainik Gomantak

चोच आणि जीभ

चोच किंवा जीभ फुलांच्या आत घालून ते फुलपाखरांप्रमाणे मकरंद व लहान कीटक शोषून घेऊन खातात. मकरंद गोळा करताना शरीर फुलांना घासले गेल्याने फुलांतील परागकण त्यांच्या पिसांना चिकटतात आणि उडताना परागकण इतरत्र पसरून परागण घडून येते.

Hummingbirds | Dainik Gomantak

घरटी

हमिंग पक्ष्यांची घरटी झाडाच्या दोन फांद्यांच्या बेचक्यात, झाडांच्या मोठ्या पानांवर, खडकांवर, तर कधीकधी झाडाला टांगलेली दिसून येतात. घरट्याचा आकार कपासारखा असून ते वनस्पतींचे धागे, दगडफूल, कोळ्याचे जाळे, प्राण्यांचे केस यांपासून तयार केलेले असते. मादी घरट्यामध्ये एक किंवा दोन पांढऱ्या रंगाची अंडी घालते. 

Hummingbirds | Dainik Gomantak

अंड्यांचा कालावधी

अंड्यांचा उबवण कालावधी 15–20 दिवसांचा असतो. अंडी उबविण्याचे तसेच पिलांच्या संगोपनाचे काम मादी एकटीच करते. हमिंग पक्ष्यांचे शरीर लहान असले, तरी त्यांचे पंख जलदपणे फडफडत असल्याने त्यांना अधिक प्रमाणात ऊर्जा लागते. म्हणून ते सतत अन्न खात असतात. परिसराचे तापमान घटले की, ते सुस्त होतात

Hummingbirds | Dainik Gomantak

उंच भरारीच्या बादशाहच्या या गोष्टी माहितेयत का?

Eagle | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी