Akshata Chhatre
जगभरात वेगवेगळे ट्रेंड उदयाला येतात, काही मजेशीर असतात तर काही विचित्र. सध्या चीनमध्ये लोकप्रिय होत असलेला “मॅन मम्स” ट्रेंड हे याचेच एक आगळंवेगळं उदाहरण आहे.
या ट्रेंडमध्ये जिममध्ये जाणारे, चांगल्या शरीरयष्टीचे तरुण मुलींना मिठी मारण्याच्या बदल्यात पैसे घेतात.
शैक्षणिक तणाव, ऑफिसचा प्रेशर किंवा वैयक्तिक समस्यांमुळे थकलेल्या आणि तणावात असलेल्या मुली मेट्रो स्टेशन, पार्क, मॉलसारख्या सार्वजनिक ठिकाणी ‘मॅन मम्स’ शोधतात.
हे मॅन मम्स ५ मिनिटांच्या मिठीसाठी २५० ते ६०० रुपये घेतात.
काही मुलांनी तर रस्त्याच्या कडेला पोस्टर घेऊन उभं राहून ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
या ट्रेंडमागे केवळ पैसे कमवण्याचा हेतू नसून, एक सामाजिक आणि मानसिक गरज भागवण्याची भावना आहे, असं काही ‘मॅन मम्स’चं म्हणणं आहे.