गोमन्तक डिजिटल टीम
फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केलंत, तर मोबाईलवरही तुम्ही जबरदस्त फोटो काढू शकता. यासाठी मोबाईलच्या कॅमेऱ्याचा वापर कसा करावा याच्या काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.
चांगली फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी जमणं ही एक कला आहे.
तुम्हाला चांगले फोटो काढायचे असतील तर कॅमेऱ्याचा वापर ऑटो मोड ऐवजी मॅन्युअल मोडवर करा. यामुळे तुम्हाला लाइट, फोकस, सबजेक्ट अनेक गोष्टी अॅडजस्ट करता येतील.
फोनमधील कॅमेरातील शटर स्पीड सेट करून तुम्ही वेगवेगळे फोटो घेऊ शकता. शटर स्पीड वाढवल्यास तुम्हाला चालणाऱ्या व्यक्तींचा किंवा प्रवासात एखाद्या सुंदर दृश्याचा फोटो कॅमेरामध्ये कैद करणं सहज शक्य होईल.
फोकसचे देखील कॅमेरामध्ये अनेक ऑटोमोड उपलब्ध असतात. यात बॅग्राउंड डिफोकस किंवा एखादा ठराविक ऑब्जेक्ट डिफोकस तुम्ही करू शकता.
फोटो आणि व्हिडीओसाठी महत्वाची गोष्ट असले ती म्हणजे लाईट. जर कमी प्रकाश असेल तर तुम्हाला इनडोर फोटोग्राफीसाठी एक्स्ट्रा लाइट वापरल्यास चांगला रिझल्ट मिळू शकतो. आउटडोर फोटोग्राफी करताना लाईटची दिशा पाहून फोटो क्लिक करणं गरजेचं आहे.
चांगला फोटो काढण्यासोबत तुम्हाला फोटो एडिटिंगचं थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे.
फोटो काढताना कॅमेरा स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी मोबाईल दोन्ही हातांनी पकडा किंवा तुम्ही स्डॅण्डचा वापर करू शकता.