Akshata Chhatre
डोक्यावर खाज येणे, सतत खांद्यावर पांढरा भुगा पडणे अशा तक्रारी अनेकांना असतात, पण या त्रासामागचं नेमकं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कारण प्रत्येक वेळी हे लक्षण केवळ डँड्रफमुळेच होतं असं नाही; अनेकदा हे ड्राय स्कॅल्पमुळे म्हणजेच डोक्याच्या त्वचेतल्या कोरडेपणामुळे देखील उद्भवू शकतं.
दोन्ही त्रास दिसायला सारखे वाटले तरी त्यांची कारणं, लक्षणं आणि उपचार वेगळे असतात, त्यामुळे फरक ओळखणं आणि योग्य उपाय निवडणं आवश्यक आहे.
डँड्रफ म्हणजे डोक्याच्या त्वचेत बुरशीमुळे होणारी समस्या, ज्यात तेलकट त्वचेमुळे पांढऱ्या किंवा किंचित पिवळसर सुकलेल्या त्वचेचे मोठे कण झडू लागतात.
तेलकटपणा जास्त असल्याने बुरशीला पोषक वातावरण मिळतं आणि कोंडा वाढतो.
ड्राय स्कॅल्प म्हणजे त्वचेत नैसर्गिक तेलाचा अभाव होऊन येणारा कोरडेपणा; यात त्वचा घट्ट, ताणलेली वाटते आणि किरकरी निर्माण होते.
थंडीचं हवामान, जास्त गरम पाण्याचा वापर, तीव्र केमिकल असलेले शॅम्पू किंवा अपुरी आर्द्रता ही यामागची मुख्य कारणं आहेत.