Akshata Chhatre
माणसाचं वागणं आणि चेहऱ्याचे हावभाव पाहून कोणाच्या मनात काय चाललंय हे समजणं शक्य आहे. हे कसं ओळखावं? बघूया काही खास टिप्स!
सतत जर का माणूस नजर चुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते काहीतरी लपवतायत. पापण्यांची सतत उघडझाप हे अस्वस्थ असण्याचं प्रतीक आणि मात्र जो माणूस थेट डोळ्यांमध्ये बघतो तो प्रामाणिक आहे असं म्हणू शकता.
जर का कोणाच्या चेहऱ्यावर नकळत हसू येत असेल तर ते आनंदी आहेत किंवा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतायत. एखाद्याच्या कपाळावर आठ्या असतील तर ते चिंतेत आहेत. शिवाय जर का कोणी सतत ओठ चावत असेल तर ते भयभीत आहेत किंवा अस्वस्थ आहेत असा त्याचा अर्थ होतो.
कोणाच्या बोलण्या गफलत होत असेल तर ते नक्कीच काहीतरी लपवतायत. एखादा उत्तर द्यायला, बोलायला टाळाटाळ करत असेल तर त्यांच्या आहेत.
एखादा माणूस कसा बसतो, उठतो, चालतो, वागतो यावरून अनेक गोष्टी लक्षत येऊ शकतात.
एखादा माणूस काय विचार करतोय हे आपण समजू शकत नाही. मात्र तो कोणती गोष्ट सतत करतोय, काय टाळतोय यावरून मनात काय सुरु असेल याचा अंदाज लावता येतो.