दारू-सिगारेटची तलफ होईल गायब! व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण

Sameer Amunekar

आल्याचे तुकडे आणि लिंबू

जेव्हा जेव्हा सिगारेट किंवा दारूची तलफ येईल, तेव्हा आल्याचे बारीक तुकडे करून त्यावर लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते चघळावे. आल्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे व्यसनाची तीव्र इच्छा (Cravings) कमी होण्यास मदत होते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

मनुके आणि खजूर

दारू सोडताना शरीरात साखरेची पातळी अचानक खालावते, ज्यामुळे पुन्हा पिण्याची इच्छा होते. अशा वेळी रोज ४-५ खजूर किंवा थोडे मनुके खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि तलफ नियंत्रणात येते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

ओवा आणि बडीशेप

ओवा आणि बडीशेप एकत्र भाजून एका डबीत भरून ठेवा. सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास हे मिश्रण तोंडात टाकून चघळत राहा. यामुळे तोंडाची चव बदलते आणि विडी-सिगारेटची ओढ कमी होते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

अश्वगंधा आणि आवळा

अश्वगंधा मानसिक ताणतणाव आणि अस्वस्थता कमी करते, जी व्यसन सोडताना प्रामुख्याने जाणवते. तसेच आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते, जे निकोटीनची ओढ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

भरपूर पाणी आणि लिक्विड डाएट

व्यसन सोडताना शरीराला डिटॉक्स करणे गरजेचे असते. दिवसभरात भरपूर पाणी, लिंबू पाणी, कोमट पाण्यात मध किंवा नारळ पाणी प्या. यामुळे शरीरातील निकोटीन आणि अल्कोहोलचे अंश लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

सफरचंदाचा रस

सफरचंद शरीरातील विषारी घटक स्वच्छ करण्याचे काम करते. नियमितपणे सफरचंदाचा रस प्यायल्याने किंवा उकडलेले सफरचंद खाल्ल्याने दारूची नशा उतरण्यास आणि हळूहळू तिची सवय सुटण्यास मदत होते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak

तुळशीची पाने

तुळशीमध्ये अँटी-स्ट्रेस आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोज सकाळी उठल्यावर तुळशीची ३ ते ४ पाने चावून खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि तंबाखू, सिगारेट किंवा अल्कोहोलची क्रेविंग कमी होते.

How To Quit Alcohol And Smoking Naturally | Dainik Gomantak