Akshata Chhatre
पावसाळा ऋतू ओलावा आणि आर्द्रता घेऊन येतो, त्यामुळे बटाटे आणि कांदे साठवणं खरं तर मोठं आव्हान ठरतं; जास्त आर्द्रतेमुळे हे लवकर कुजतात, त्यात बुरशी निर्माण होते.
खरेदी केल्यानंतर पॅकेटमधून बाहेर काढून नीट वाळवा, त्यावर माती असेल तर हळूवारपणे झटकून काढा पण धुवू नका कारण ओलाव्यामुळे कुजण्याचा धोका वाढतो.
कापलेले, मऊ किंवा अंकुरलेले बटाटे आणि कांदे लगेच वेगळे करा कारण एक खराब तुकडा इतरांनाही लवकर खराब करतो.
हे नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश नसतो आणि आर्द्रता कमी असते.
बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका कारण बटाट्यांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे कांदे लवकर फुटतात आणि दोघांचंही आयुष्य कमी होतं.
बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका कारण बटाट्यांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे कांदे लवकर फुटतात आणि दोघांचंही आयुष्य कमी होतं.
पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी गरजेपुरतेच कमी प्रमाणात घ्या; शिवाय कांदे महिनेभर टिकवण्यासाठी नायलॉन स्टॉकिंग्जचा वापर करता येतो.