गोमन्तक डिजिटल टीम
पावसाळ्यात भाज्यांमध्ये किडे आढळणे आणि त्यांना बुरशी लागणे असे प्रकार घडतात. त्यामुळं मान्सूनमध्ये भाज्या जास्त दिवस कशा टिकवून ठेवणार असा प्रश्न पडतो.
पालेभाज्या पावसाच्या दिवसांत लवकर खराब होतात. तसेच पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांना बुरशी लागते. त्यामुळं जाणून घेऊया भाज्यांची काळजी कशी घ्यावी.
पावसाळ्यात नेहमीच ताजी भाजी खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी भाजीचा छोटासा तुकडा तोडून बघा त्यामुळं तुम्हाला भाजी ताजी आहे का नाही याचा अंदाज येईल
भाजी थोडीशी जरी काळपट असेल तर अशी भाजी खरेदी करताना टाळावे.
ताजी भाजी ओळखताना तुम्ही भाज्यांचा वास घेऊ शकता. जर भाजी खराब असेल तर त्याच्या वासाने तुम्हाला ओळखणे सोप्प होईल.
बाजारातून भाज्या घेऊन आल्यानंतर त्या गरम पाण्यातून चांगल्या धुवून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात मीठदेखील टाकू शकता.
भाज्या सुकल्यानंतर योग्य पद्धतीने फ्रीजमधील खालच्या भागात ठेवून द्या. फ्रीजमध्ये ठेवताना भाज्या एकाखाली एक ठेवू नका.