Pramod Yadav
शरीराचे वजन आणि आकार वाढणे याला लठ्ठपणा म्हटले जाते.
पुरुषांचा बीएमआय (body mass index) ३० किंवा त्यापेक्षा अधिक आणि महिलांचा २८.६ किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास तो लठ्ठपणा गृहीत धरला जातो.
लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये व्यायमाचा अभाव आणि दिवसाची झोप यांचा समावेश आहे.
तसेच, शरीराकडे दुर्लक्ष आणि मानसिक कसरतची कमतरता देखील लठ्ठपणाची कारणे आहेत.
आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, लठ्ठपणा टाळण्यासाठी दिवसा झोप घेणे टाळावे.
पुरेसा शारीरिक आराम आणि मानसिक आराम देखील घ्यावा.
आणि दैनंदिन एक व्यवस्थित रुटीन फॉलो करण्याचा सल्ला आयुषच्या वतीने देण्यात आलाय.