Sameer Panditrao
तुमच्या जवळच्या व्यक्तीला मानसिक ताण आहे का? ओळखण्याची ७ महत्त्वाची चिन्हे जाणून घ्या.
मित्र अचानक चिडचिडा, रागीट किंवा खूप शांत झाला असेल तर तो तणावाखाली असू शकतो.
खूप जास्त झोपणे किंवा अगदी झोप न लागणे हे तणावाची प्रमुख लक्षणे आहेत.
डोकेदुखी, थकवा, पोटदुखी, वारंवार आजारी पडणे हेही ताणाचे संकेत असू शकतात.
मित्र गप्पा मारणं टाळू लागतो, भेटीगाठी कमी करतो किंवा स्वतःला एकटा ठेवतो.
अभ्यास, काम किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये अचानक रस कमी होणे तणावाचे लक्षण.
तुमच्या मित्रामध्ये ही लक्षणे दिसली तर त्याच्याशी संवाद साधा, साथ द्या आणि आवश्यक वाटल्यास व्यावसायिक मदत घेण्यास प्रोत्साहित करा.