Akshata Chhatre
लग्नानंतर मैत्री कायम ठेवायची असेल, तर खुल्या संवादाला प्राधान्य द्या, नियमित भेटींसाठी वेळ राखून ठेवा आणि तुमच्या वैवाहिक जीवनात मित्रांना समाविष्ट करण्याचे मार्ग शोधा.
मित्रांना वेळ देणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी मानून, आठवड्यातून एकदा कॉफी डेट किंवा महिन्यातून एकदा गेट टुगेदर ठरवा.
प्रत्यक्ष भेट शक्य नसेल, तेव्हा फोन, मेसेज किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात रहा.
योग्य त्या वेळी मित्रांना व त्यांच्या जोडीदारांना कपल फ्रेन्डली गेट टुगेदरला आमंत्रित करा.
मित्रांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या आयुष्यात खरी रुची दाखवा. मित्रांच्या करिअर किंवा व्यक्तिगत जीवनातील यशाचे कौतुक करा व प्रोत्साहन द्या.
स्वतःच्या जोडीदाराच्या मित्रांशी व त्यांच्या कुटुंबीयांशीही नवे संबंध निर्माण करण्यास मागेपुढे पाहू नका. व्यस्त वैवाहिक आयुष्यातही, केवळ स्वतःच्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी काही वेळ राखून ठेवा.
लग्नानंतर मैत्रीत काही बदल होऊ शकतात वेळापत्रक, प्राधान्ये बदलू शकतात. हे समजून घ्या व जुळवून घ्या.