Akshata Chhatre
कोथिंबीर ही प्रत्येक घरात वापरली जाणारी एक अत्यावश्यक सुगंधी भाजी आहे. अन्नाच्या चव आणि सजावटीसाठी तिचा वापर होतोच, पण ताजी कोथिंबीर पटकन खराब होणं ही नेहमीची अडचण असते.
मात्र, काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स वापरून तुम्ही कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवू शकता.
बाजारातून कोथिंबीर आणल्यावर प्रथम तिच्या मुळ्या कापाव्यात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. त्यानंतर ती छान वाळवावी.
नंतर ओल्या टॉवेलमध्ये किंवा सुती कपड्यात गुंडाळून झिप-लॉक बॅग किंवा एअर टाईट डब्यात ठेवावी. डब्याच्या आत टिश्यू पेपर ठेवल्यास कोथिंबीरचा ओलावा शोषून घेतला जातो आणि ती ताजी राहते.
कोथिंबीर एका पाण्याच्या भांड्यात ठेवून त्यावर फॉइलने झाकण देऊनही ताजी ठेवता येते. पाण्यात थोडं व्हिनेगर घातल्यास बुरशी होण्याचा धोका कमी होतो.
तुम्हाला कोथिंबीर २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ साठवायची असल्यास, मलमलच्या कापडात वाळवलेली पाने गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत.