Akshata Chhatre
आपल्या आयुष्यात एखादा प्रिन्स चार्मिंग असावा, ज्याच्याकडे एक नजर टाकताच मन हरपावं असं स्वप्न जवळपास प्रत्येक मुलीचं असतं.
प्रत्यक्षात पहिल्याच भेटीत कोणावर प्रभाव पाडणं थोडं फिल्मी वाटतं, पण काही खास गोष्टी खरंच अशा असतात ज्या केल्याने मुलींना पहिल्याच भेटीत इम्प्रेस करता येतं.
मस्क्यूलर बॉडी, वेल-ग्रूम्ड लुक आणि योग्य पेहराव असलेल्या मुलांमध्ये अशा मुलांकडे केवळ बाह्य सौंदर्य नसतं, तर त्यांचा कॉन्फिडन्स, देहबोली आणि स्टाइलमधून येणारी एक वेगळीच छाप असते.
आय कॉन्टॅक्ट ठेऊन मनापासून संवाद साधणारे मुलगे मुलींना विशेष भावतात. हे फक्त आकर्षणच नाही, तर त्या मुलाच्या आत्मविश्वासाचंही द्योतक ठरतं.
हसतमुख चेहऱ्याचं महत्व तर वेगळंच आहे. स्मित हास्य केवळ व्यक्तिमत्त्व खुलवत नाही, तर माणूस मैत्रीपूर्ण, उघड आणि सोशल असल्याचंही दाखवतं.
एकंदरीत, चांगला पेहराव, व्यवस्थित ग्रूमिंग, आत्मविश्वास, नजर न हटवता संवाद साधणं, आणि नैसर्गिक हास्य या सगळ्या गोष्टी मिळूनच पहिल्याच भेटीत तुमच्याकडे मुलींचं लक्ष वेधतात.