Akshata Chhatre
नातं टिकवण्यासाठी प्रेम व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.
पण प्रेम व्यक्त करणं म्हणजे फक्त 'I Love You' म्हणणं नाही
प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची एक वेगळी 'भाषा' असते
काही लोकांना भावना शब्दांद्वारे व्यक्त करायला आवडतात. 'तू खूप छान आहेस', 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असे शब्द त्यांना ऐकायला आवडतात.
काही लोकांना शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम जाणवते. त्यांना मदत करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांची कामे सोपी करणे महत्त्वाचे वाटते.
काही जोडीदारांसाठी भेटवस्तू हे प्रेमाचे सर्वात मोठे प्रतीक असते. भेटवस्तू महागड्या नसून, त्यातील भावना महत्त्वाच्या असतात.
काही लोकांसाठी, एकत्र वेळ घालवणे हीच प्रेमाची सर्वात मोठी भाषा आहे. त्यांना तुमचे पूर्ण लक्ष आणि उपस्थिती आवश्यक असते.