Akshata Chhatre
तुमच्या आजूबाजूला असे स्व-केंद्रित लोक असतील, ज्यांचे लक्ष फक्त स्वतःवरच असते आणि त्यांना इतरांच्या गरजांची, इच्छांची कोणतीही पर्वा नसते.
स्वार्थी असणे हा एक असा स्वभाव आहे, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध आणि काम दोन्ही बिघडू शकतात.
अशा लोकांना चर्चा किंवा मीटिंगमध्ये जास्तीत जास्त स्वतःबद्दलच बोलण्याची सवय असते.
हे लोक दुसऱ्याची परिस्थिती त्या तीव्रतेने जाणवत नाहीत किंवा ती समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहणे यांना जमत नाही.
जेवढे देतात त्यापेक्षा जास्त 'मिळवण्याची' अपेक्षा ठेवण्याची यांची वृत्ती असते. त्यांच्यासोबत नातेसंबंधात असणाऱ्या लोकांना नेहमी एकटेपणा जाणवतो.
हे लोक त्यांच्या पद्धतीनेच काम करण्याचा किंवा करून घेण्याचा विचार ठेवतात. तडजोड करणे किंवा दुसऱ्याच्या इच्छेनुसार जुळवून घेणे त्यांना कठीण वाटते.
या लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव होत नाही आणि ते आपल्या चुका नेहमी दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते स्वतः जबाबदारीतून मुक्त होतील.