दैनिक गोमन्तक
आपल्यापैकी अनेकजण नैराश्याचा सामना करताना दिसतात.
सध्या ज्या स्थितीत आपण आहोत, त्यामध्ये समाधानी असत नाही. सतत काळजी वाटणे, दु:खी असणे आणि चिडचिडेपणा नैराश्यात असलेला माणसांमध्ये दिसून येतो.
नैराश्यातून बाहेर येण्यासाठी आपल्या आयुष्यात काही महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे.
पौष्टिक अन्न खायला सुरुवात करा
घराबाहेर पडा, सकाळच्या उन्हात उभे राहा. कोवळ्या उन्हाचा तुम्हाला नैराश्यातून बाहेर येण्यासाठी उपयोग येईल.
चांगली झोप घ्या. निद्रानाश होणे हे तुमच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करते.
तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोला, संवाद साधा.