Akshata Chhatre
वैवाहिक जीवन गोड व्हावं, सुखकर व्हावं यासाठी केवळ एकमेकांवरील प्रेम पुरेसं नसतं; त्यासोबत समजूतदारपणा, संयम आणि परस्पर संवाद हीही तितकीच महत्त्वाची तत्त्वं आहेत.
काही वेळा पत्नी हट्टी स्वभावाची असते ती आपले मत ठामपणे मांडते, एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरते.
अशा वेळी पतीने संताप न करता, संयम आणि समजूतदारपणाने गोष्टी हाताळण्याची गरज असते.
प्रेमानंद महाराज सांगतात की, "पत्नी हट्टी असेल, तर तिच्या भावना जाणून घ्या, तिला समजून घ्या आणि प्रेमाने संवाद साधा."
अनेकदा हट्टीपणा हा मनातील असुरक्षितता, अपेक्षा किंवा विशिष्ट अनुभवांमुळे येतो, त्यामुळे तिच्याशी रागाने नव्हे तर समजुतीने वागणं गरजेचं असतं.
पतीने जर तिच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि तिच्या मागण्यांमध्ये जर काही योग्य वाटलं, तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. तिच्या मतांना किंमत दिल्यास तिचा विश्वास वाढतो आणि नातं अधिक घट्ट होतं.