Akshata Chhatre
पेरू हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे.
विशेषतः थंडीच्या दिवसांत पेरूची गोडी आणि सुगंध अप्रतिम असतो. मात्र, बाजारात गोड आणि ताजा पेरू कसा ओळखायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो.
चांगल्या पेरूची ओळख ही त्याच्या देठात आणि स्पर्शामध्ये दडलेली आहे. बाहेरून सुंदर दिसणारा पेरू आतून बेचव असू शकतो. म्हणून फक्त रंगावर न जाता, या ७ गोष्टी तपासा.
जर देठ हिरवे, थोडे ओलसर आणि मजबूत असेल, तर पेरू नुकताच तोडलेला आहे. पेरू नाकाजवळ घेऊन हुंगा. गोड आणि तीव्र नैसर्गिक सुगंध येत असेल, तर तो आतून पिकलेला आणि गोड आहे.
पेरू हलका दाबल्यास थोडासा कडक आणि लगेच पूर्ववत होणारा असावा. जास्त कडक पेरू कच्चा असतो, तर जास्त मऊ झालेला पेरू खराब होण्याची शक्यता असते.
जो पेरू त्याच्या आकाराच्या तुलनेत वजनदार वाटतो, तो अधिक रसाळ आणि गोड असतो. गडद हिरव्या रंगाऐवजी फिकट पिवळसर-हिरवा रंग पिकलेल्या आणि गोड पेरूची ओळख आहे.
पेरूवर काळे, मोठे किंवा मऊ डाग नसावेत, कारण ते आतून सडल्याचे लक्षण असू शकते. जर पेरूला पाने जोडलेली असतील, तर ती हिरवी आणि ताजी असावी लागतात.