Akshata Chhatre
संवेदनशील त्वचा वेगवेगळ्या हवामानामुळे, धूळ-मातीमुळे आणि त्वचेसाठी अयोग्य उत्पादनांमुळे सहज त्रासलेली दिसते. म्हणूनच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. चला, जाणून घेऊया संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त स्किनकेअर टिप्स!
हार्श केमिकल्स असलेले साबण आणि फेसवॉश टाळा. त्याऐवजी, नैसर्गिक घटक असलेला सौम्य आणि हायड्रेटिंग फेसवॉश वापरा.
संवेदनशील त्वचेला नेहमी मॉइश्चरायझरची गरज असते. हायपोअलर्जेनिक आणि सुगंधरहित मॉइश्चरायझर निवडा, जो त्वचेला पोषण देईल.
संवेदनशील त्वचेसाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन आवश्यक आहे. त्यामुळे त्वचेचे सनबर्न आणि इतर समस्या टाळता येतात.
हळद, कोरफड (अलोवेरा) आणि गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात. ते त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करतात.
हार्श केमिकल्स असलेला मेकअप संवेदनशील त्वचेसाठी घातक असतो. त्यामुळे माइल्ड आणि स्किन-फ्रेंडली उत्पादनांचा वापर करा.
संवेदनशील त्वचेची योग्य काळजी घेतल्यास ती चमकदार आणि निरोगी राहते. सौम्य उत्पादने वापरा, नैसर्गिक उपाय करा आणि त्वचेला हवं तितकं पोषण द्या!