Akshata Chhatre
लग्नानंतर प्रत्येक नवरा आपल्या सासरी एक चांगला, लाडका जावई म्हणून ओळख मिळवण्यासाठी थोडी मेहनत घेतो आणि ते खरंच योग्य आहे.
मुलगा हा आपल्या आईचा लाडका असतो, पण सासरच्या लोकांमध्येही आपलं स्थान मजबूत करायचं असेल, तर काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं.
सासू-सासरे किंवा सासरचे इतर सदस्य पहिल्याच भेटीत तुमच्याबद्दल मत बनवतात, म्हणून पहिल्या भेटीत नीटनेटके आणि कंफर्टेबल कपडे घालावेत.
त्यांच्याशी आत्मविश्वासाने, नम्रपणे आणि आदराने बोलावं. जावई म्हणून स्वतःची छाप पाडताना खोटेपणा किंवा अती अभिनय टाळावा
बायकोशी कधी मतभेद झाले किंवा भांडण झाले, तर ते सासरी बोलून दाखवू नये. अशा खाजगी गोष्टी घरातच सोडवाव्यात.
सासरी गेल्यावर, स्वतःला खूप मोठं, श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळा कौतुक मिळावं म्हणून आपण अशा गोष्टींना होकार देतो
अशा छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुम्ही सहज सासरचा लाडका जावई, दाजी किंवा जिजाजी बनू शकता.