Akshata Chhatre
जर तुम्ही बाळासाठी प्लॅन करत असाल आणि तुमची इच्छा जुळी मुले होण्याची असेल, तर काही गोष्टी जाणून घेणे खूप उपयुक्त ठरेल.
आई, आजी किंवा मावशी अशा जवळच्या नात्यात जुळी असतील, तर त्या महिलांमध्ये नैसर्गिकरित्या ही शक्यता जास्त असते.
ज्या महिलांना गर्भधारणा होण्यात अडचण येते आणि डॉक्टरांनी ओव्हुलेशन इन्ड्यूसिंग ड्रग्स दिल्या असतात, त्यांच्याकडे एकावेळी एकापेक्षा जास्त अंडी तयार होण्याची शक्यता असते.
IVF मध्ये डॉक्टर कधी कधी दोन किंवा अधिक भ्रूण गर्भाशयात रोपित करतात, त्यामुळे जुळ्या किंवा ट्रिप्लेट्सची शक्यता वाढते.
या सर्व कारणांनंतरही शेवटी जुळी मुले होणे हे पूर्णपणे नशिबावर आणि योगायोगावरच अवलंबून असते.