Akshata Chhatre
जर एखादी मुलगी तुम्हाला पहिल्याच नजरेत आवडली असेल आणि तिच्याशी मैत्री किंवा जवळीक साधायची इच्छा असेल, पण ती मुलगी तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नसेल, तर अशा परिस्थितीत संयम आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा.
अनेकदा मुलं तिला इम्प्रेस करण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतात, पुन्हा पुन्हा मेसेज करतात, तिच्यावर दबाव आणतात, पण हे प्रकार उलट तिच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करतात.
पहिल्यांदा तिच्याबद्दल थोडी माहिती घ्या. ती सिंगल आहे का, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, ती सोशल मीडियावर कशी अॅक्टिव्ह आहे इत्यादी.
पहिल्या मेसेजनंतर ती प्रतिसाद देत नसेल, तर लगेच पुन्हा-पुन्हा मेसेज करू नका, रात्री उशिरा संपर्क साधणं टाळा आणि काही दिवस थांबा.
तिला वेळ दिल्यास ती तुमचं संयम आणि समजूतदारपणा नक्कीच ओळखेल. त्या वेळी “कशी आहेस?”, “सर्व ठिक आहे ना?” असे साधे पण आपुलकीचे मेसेज पाठवा.
सुरुवातीला फ्लर्ट करणे, अतिउत्साही किंवा भावनिक होणे टाळा. जेव्हा ती संवाद साधायला सुरुवात करेल, तेव्हा लहान आणि अर्थपूर्ण संभाषण करा.
प्रत्येक नातं हळूहळू फुलतं, त्यामुळे घाई करू नका.