Akshata Chhatre
गोव्याची राजधानी म्हणून मडगाव किंवा जुने गोवे नव्हे तर पणजी का निवडली गेली? असा कधी प्रश्न पडलाय का?
वेल्हा गोवा म्हणजेच जुना गोवा हा एकेकाळी पोर्तुगीजकालीन गोव्याची गजबजलेली राजधानी होता.
अठराव्या शतकात वारंवार उद्भवलेल्या प्लेगसारख्या साथीच्या आजारांनी या शहराला अक्षरशः उद्ध्वस्त केलं. परिणामी पोर्तुगीज सत्ताधीशांना नव्या आणि सोयीस्कर ठिकाणाची गरज भासली.
त्यावेळी एक छोटंसं, शांत गाव असलेलं पणजी त्यांच्या नजरेत भरलं.
मांडवी नदीच्या काठी वसलेलं हे ठिकाण आरोग्यदायी वातावरण, पाण्याची सोय आणि व्यापारी दृष्ट्या सुरक्षित असं मानलं गेलं.
गोव्याच्या मुक्तीनंतर, म्हणजेच १९६१ नंतर "नोव्हा गोवा" हे नाव मागे सारून पुन्हा मूळ नाव "पणजी" रूढ झालं.
आज पणजी केवळ राजधानीच नाही, तर गोव्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक हृदय बनलं आहे.