Akshay Nirmale
गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेले साळावली धरण पुर्ण भरले आहे. यात धरणात सध्या 105.2 टक्के पाणीसाठा आहे.
अंजुणे धरण आत्तापर्यंत 50 टक्के भरले आहे. या धरणाला पुर्ण भरण्यास थोडा अवधी लागू शकतो.
आमठाणे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण सध्या 95 टक्के भरले असून पावसाचा जोर असाच राहिला तर आगामी काही दिवसातच हे धरणही पुर्ण भरेल.
पंचवाडी धरणदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात 103.1 टक्के पाणी साठा आहे.
चापोली धरणातील पाणीसाठी 78.2 टक्के इतका झाला आहे.
गावणे धरणदेखील पूर्ण भरले आहे. या धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.
तिलारी धरण सध्या भरण्याच्या मार्गावर आहे. धरणातून विसर्गाला सुरवात झाली आहे. सध्या धरणात 70.2 टक्के पाणीसाठा आहे.