Akshata Chhatre
पालक म्हणून आपण आपल्या मुलांना शिस्त, स्वावलंबन आणि जबाबदारी शिकवण्याचा प्रयत्न सतत करत असतो.
त्यातच पॉकेट मनी म्हणजे मुलांना स्वतःच्या निर्णयांची चव चाखण्याची एक संधी असते.
योग्य वयात आणि योग्य प्रमाणात दिलेल्या पॉकेट मनीमुळे मुलांना आर्थिक समज तर येतेच,
पण त्यांनी कमवलेला आत्मविश्वास त्यांचं पुढचं आयुष्य घडवतो.
पैसा कसा साठवायचा, कुठे खर्च करायचा, गरज आणि इच्छा यामधील फरक काय हे सगळं ते अनुभवातून शिकतात.
पैसे मुलांना केवळ त्यांच्या गरजा भागवण्यासाठीच नव्हे, तर त्यांना निर्णय घेणं, पैसे साठवणं, गरज-इच्छा यामधला फरक समजून घेणं आणि जबाबदारीने वागणं शिकवतात.
मुलांना पॉकेट मनी किती आणि कधीपासून द्यावी? तर त्याचे योग्य वय साधारण ७ ते ८ वर्षे मानले जाते. या वयात मुले पैसे हाताळण्याची सुरुवात करू शकतात.
खूप पैसे दिले तर त्यातून अपव्यय आणि चुकीच्या सवयी निर्माण होऊ शकतात. तर खूप कमी दिल्यास मुलं अपूर्णतेच्या भावनेने त्रस्त होऊ शकतात.