Sameer Panditrao
आपण रोज खूप बोलतो.
पण आपण नेमकं किती बोलतो हे माहित आहे का?
माणसाच्या बोलण्यावरील संशोधनानुसार, एक व्यक्ती दररोज सुमारे सरासरी 7000 ते 20000 शब्द बोलतो.
हे शब्द सलग बोलायला लागतो सुमारे एक ते अडीच तास लागतो.
व्यक्ती, स्वभावपरत्वे यात बदल होऊ शकते.
काही जुनी संशोधनं सांगतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त बोलतात, पण नवीन संशोधनानुसार खूपसा फरक आढळत नाही.
शिक्षक, वकील, विक्रेते, व्याख्याते ही मंडळी जास्त बोलतात.