Akshata Chhatre
केस धुणे ही स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली एक सामान्य प्रक्रिया आहे.
अनेकदा आपण केस धुताना किंवा धुतल्यानंतर अशा काही चुका करतो, ज्यामुळे केसांचे आणि स्कॅल्पचे नुकसान होते.
विशेषतः भारतात, "रोज केस धुतल्यास ते खराब होतात किंवा जास्त गळतात" असा एक मोठा गैरसमज आहे.
तेलकट स्कॅल्प असणाऱ्यांनी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केस धुणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदाच केस धुतल्यास तेल आणि कोंड्याचा थर जमा होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या वाढते.
ड्रायर केसांच्या खूप जवळ ठेवू नका. केस तुटणे टाळण्यासाठी तो कमीत कमी १५ सेमी दूर ठेवा.
ओल्या केसांवर स्ट्रेनर किंवा कर्लर वापरणे पूर्णपणे टाळावे. हिटिंग टूल्स वापरण्यापूर्वी केस पूर्णपणे सुकले पाहिजेत.