Akshata Chhatre
बाळाच्या पहिल्या हालचाली या आईसाठी केवळ आनंददायीच नव्हे तर भावनिक दृष्ट्याही खूप महत्त्वाच्या असतात.
गर्भधारणेच्या प्रवासात हा टप्पा म्हणजे जणू नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा ठसा असतो.
गर्भधारणेत साधारण अठराव्या ते बावीसाव्या आठवड्यादरम्यान बाळ हलण्यास सुरुवात करते, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गर्भधारणेत हा अनुभव थोडा लवकर म्हणजे सोळाव्या आठवड्यापासूनच जाणवू शकतो.
सुरुवातीला या हालचाली हलक्या फडफडीसारख्या, पोटात गॅसचे फुगे उठल्यासारख्या किंवा पॉपकॉर्न फुटल्यासारख्या जाणवतात.
डॉक्टर सांगतात की साधारणतः प्रत्येक बारा तासांत दहा ते बारा वेळा बाळाची हालचाल जाणवली पाहिजे.
जेवणानंतर किंवा अल्पोपहार घेतल्यानंतर एका तासाच्या आत तीन ते चार लाथा जाणवणे सामान्य आहे.
चौवीस आठवड्यांपूर्वी हालचाली हलक्या किंवा अनियमित असल्या तरी काळजीचे कारण नसते.