Akshata Chhatre
कित्येक घरांमध्ये चहा हे केवळ एक पेय नाही तर एक भावना आहे. पण या सवयीला मर्यादा नसतील तर त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मर्यादेपेक्षा जास्त चहा पिणे, रिकाम्या पोटी चहा घेणे, किंवा अवेळी चहा पिणे हे सर्व आरोग्यासाठी हानिकारक आहे.
सकाळी चहा पिण्याऐवजी एखादे ताजे फळ खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळते.
दिवसातून दोन ते तीन कप चहा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त चहा प्यायल्याने शरीरातील कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ताण आणि अस्वस्थता जाणवू शकते.
संध्याकाळी उशिरा चहा घेतल्याने झोपेचा पॅटर्न बिघडू शकतो. यामुळे झोप न लागणे किंवा चिडचिड होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
भूक लागल्यावर चहा पिण्याऐवजी पौष्टिक आहार घ्या. चहा आम्लयुक्त असल्याने रिकाम्या पोटी प्यायल्यास ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
चहाबरोबर बिस्किटे किंवा नमकीनऐवजी भाजलेले मखाने, काळे चणे किंवा मिश्र बिया यांसारखे पौष्टिक पदार्थ खा.