Puja Bonkile
उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
आज पासून म्हणजेच 1 मार्च पासून घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.
घरगुती सिलेंडरचे दर हे 50 तर कमर्शियल सिलेंडर तब्बल 350 रुपयांनी महाग झाले आहे.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या आहे.
देशातील एलपीजी गॅसची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी प्राइसने ठरवली जाते.
सौदी अरेबियाच्या 'अरमाको' कंपनीच्या एलपीजी गॅस किंमतीच्या आधारे भारतातील गॅस दर निश्चित होतात.
लपीजीच्या किंमतीमध्ये गॅसचा दर, कस्टम ड्युटी, वाहतूक खर्च, विमा आदी घटकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमतीचा परिणाम देशातील गॅस दरांवरही होतो.
डॉलरच्या तुलनेत रुपयांची होणारी घसरण देखील गॅसच्या दरांवर परिणाम करते.