Pranali Kodre
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदबद्दल फिडे वर्ल्डकप फायलनमध्ये पोहचल्यानंतर बरीच चर्चा झाली.
तो भारताचा चेसमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. तो विश्वनाथन आनंदनंतर वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचणारा दुसराच भारतीय आहे.
१९ ऑगस्ट २००५ रोजी चेन्नईमध्ये जन्म झालेल्या प्रज्ञानानंदाला चेसची आवड मोठ्या बहिणीमुळे लागली.
त्याच्या वडिलांनी मुलगी वैशालीला टीव्ही बघण्याची सवय लागल्याने चेस आणून दिले,पण वैशाली व प्रज्ञानानंद या दोघांनाही या खेळाची गोडी लागली.
त्यानंतर प्रज्ञानानंदाने या खेळात चांगलीच प्रगती केली. तो १० व्या वर्षी इंटरनॅशनल मास्टर्स बनला.
त्यानंतर २०१८ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा ग्रँडमास्टर बनला होता.
प्रज्ञानानंदाने यापूर्वी कार्लसनला २०२२ मध्ये ऑनलाईन एअरथिंग्स मास्टर्स स्पर्धेत पराभूत केले होते.
दरम्यान, फिडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र कार्लसनने प्रज्ञानानंदावर मात केली आणि विश्वविजेतेपद पटकावले.
कार्लसनने पहिल्यांदाच फिडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकली आहे.